प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव – "एक पेड माँ के नाम" या सामाजिक उपक्रमांतर्गत मेरा युवा भारत केंद्र धाराशिव, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव व ग्रामपंचायत कार्यालय देवळाली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 जुलै 2025 रोजी देवळाली स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 3300 वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अरविंद पवार (तलाठी, देवळाली) होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आनंद जाधव (कृषी सहाय्यक, मेडशिंगा), श्री. रमण आगळे, श्रीमती कनेकर एस.एच. (ग्रामसेवक, देवळाली), श्री तीर्थकर पी.जी. (कृषी सहाय्यक), श्रीमती ढेकणे पी.पी. (ग्रामसेवक, मेडशिंगा), श्री अजित शिंदे, सरपंच श्रीमती रुक्मिणी सपकाळ (देवळाली), श्री अण्णा दूधभाते (सरपंच, मेडशिंगा), श्री किशोर साळुंखे, श्री विनोद आगळे, श्री हरिभाऊ भिंगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विशेषतः धीरूभाई अंबानी विद्यालय, धाराशिव येथील 100 विद्यार्थी, जयप्रकाश विद्यालय, रुईभर येथील 100 विद्यार्थी व जि.प. प्राथमिक शाळा, देवळाली येथील 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
तसेच मेरा युवा भारत कार्यालयाचे वैभव लांडगे, विवेकानंद युवा मंडळ मेडसिंगा व देवळाली येथील युवा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
स्मशानभूमी परिसरात हरित पट्टा तयार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने पर्यावरण रक्षणास हातभार लावत एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे. उपस्थित सर्व मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
0 टिप्पण्या