Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मानेवाडी येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न


    प्रतिनिधी....मनोज जाधव 


तुळजापूर (प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील मौजे मानेवाडी येथे शिवसेनेच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शाखेचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मा. संजय मोरे यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.


या प्रसंगी शिवसेनेचे विविध वरिष्ठ नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषत: शिवसेना उपनेते मा. ज्ञानराज चौगुले, सह-संपर्क प्रमुख मा. भगवान देवकते, जिल्हाप्रमुख मा. मोहन पनुरे यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


स्थानिक नेतृत्वाचेही या उद्घाटन कार्यक्रमात विशेष योगदान होते. शिवसेना नेत्या मिनाताई सोमाजी, तालुकाध्यक्ष अमोल जाधव, शिवसेना नेते सोमनाथ गुड्डे, शहाजी हाक्के, शाखाप्रमुख लक्ष्मण माने, उपशाखाप्रमुख धनाजी गडदे आणि सचिव संभाजी माने यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.


उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "शिवसेनेच्या कार्याचा विस्तार गावागावापर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. मानेवाडीतील ही शाखा लोकांच्या समस्या ऐकणारी व त्या सोडवण्यासाठी सक्रिय राहणारी ठरेल."


या कार्यक्रमाचा एक विशेष उल्लेखनीय क्षण म्हणजे मानेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर प्रथमच शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याची निवड झाली असून, ही बाब गावात आणि पक्षात अभिमानाची व चर्चेची ठरली आहे. यामुळे महिलांना नेतृत्वाची संधी मिळून पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणाला बळ मिळाले आहे.


कार्यक्रमानंतर संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या शाखेकडून जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त केला.


शिवसेनेच्या या नव्या शाखेच्या माध्यमातून मानेवाडीतील राजकारणात नवे वळण येईल, असा सूर उपस्थितांमध्ये दिसून आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या