पळसवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न....
36 रक्तदात्यांनी केले रक्तदान.....
मुख्य संपादक...मनोज जाधव...9823751412
धाराशिव तालुक्यातील पळसवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी केली जाते यामध्ये सार्वजनिक उपक्रम राबवत असताना मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदात्यांना आव्हान करतात शिवप्रेमी रक्तदात्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर जवळपास 36 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपणही काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजाला संदेश देत असताना रक्तदान हेच जीवनदान या उक्तीप्रमाणे रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाला योग्य संदेश दिला असून पळसवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करून साजरी करण्याचा एक वेगळा पायंडा ही पाडून इतर गावांना एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे त्यांच्या या पावलावर पाऊल ठेवत सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही विचारांची जयंती असून असा चांगला उपक्रम राबवून जयंती साजरी करावी असा संदेशही यातून देण्यात आला यावेळी गावातील ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यामध्ये
सरपंच हरिभाऊ सोनटक्के,उपसरपंच अविनाश मुळे,आप्पा शेलार,नितीन पांढरे,विठ्ठल कोळगे,महेश कोळगे,महादेव शेलार,प्रशांत कोळगे,प्रशांत श्रीमंत कोळगे,महेश काकासाहेब कोळगे प्रशांत कोळगे,भारत दंडनाईक,गणेश ताटे,बापू शिंदे,सुमित काशिनाथ कोळगे,धनंजय शिंदे,बालाजी दंडनाईक,नबिलाल सय्यद,विश्वजीत सोनार,चेतन शिरसाट,अर्जुन डावखरे,तानाजी शेलार,कोळगे शहाजी,तानाजी कोळगे,अंबादास दंडनाईक,भागवत कोळगे,सचिन शेलार,माधव शेलार,सोमनाथ दंडनाईक,संकेत कोळगे,लक्ष्मण रमेश कोळगे,रामभाऊ कोळगे या रक्तदात्यांनी रक्तदान केले
सदरील रक्तदान शिबिरासाठी धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी व सहकारी बांधवांनी परिश्रम घेतले
0 टिप्पण्या