Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

!! माझी शाळा समृद्ध शाळा !! जि प प्रा शाळा मेडसिंगा शाळेत इ. आठवी वर्गाचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ संपन्न झाला

!! माझी शाळा समृद्ध शाळा !!

जि प प्रा शाळा मेडसिंगा शाळेत इ. आठवी वर्गाचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ संपन्न झाला 

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

अनोखे उपक्रम राबवत मेडसिंगा गावची शाळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे....

सतत अनोखे उपक्रम राबविण्यात अव्वल असणारी शाळा म्हणजे मेडसिंगा गावची जिल्हा परिषद शाळा म्हणून परिसरात या शाळेची आणि या शाळेतील शिक्षकांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे...सतत विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी या शाळेतील सर्व शिक्षक हे शिक्षण अधिकारी,विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आणि या मुळेच शाळेतील विद्यार्थी हे वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा असो किंवा जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धा असो यात आपल्या गावाच्या नावासह शाळेचे नावही उज्वल करताना दिसून येत आहे 

आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला निरोप...

         आज आठवीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेला शिकवण्याचा, विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा, अध्यापनाचा अनुभव घेतला. मुख्याध्यापक म्हणून भाग्यलक्ष्मी सुतार व उपमुख्याध्यापक म्हणून आदर्श जाधव ने काम पाहिले.
दुपार सत्रात  निरोप समारंभ साजरा झाला, यामध्ये अनेक विद्यार्थी बोलते झाले.  शाळा सोडून जाण्याचे दुःख जाणवत होते. इ.आठवीच्या विद्यार्थ्यांनी छ. शिवाजी महाराजांचा मुखवटा शाळेला भेट दिला. व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी मु अ श्री पवार सर, काटे सर, बदाले सर, साळुंखे सर, देवकते मॅडम, आडसुळे मॅडम, लोंढे मॅडम, जाधव मॅडम व मदतनीसद काकू या सर्वांनी "जिथे कमी तिथे आम्ही" या भूमिकेतून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. श्री घोगरे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या