Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रुईभर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम भारतीय सेवेतील निवडीने उजळला गावाचा मान – कुमार अजिंक्य सुरवसेचा सन्मान


 

       रुईभर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
भारतीय सेवेतील निवडीने उजळला गावाचा मान – कुमार अजिंक्य सुरवसेचा सन्मान

      प्रतिनिधी....मनोज जाधव 

धाराशिव जिल्ह्यातील रुईभर गावातील तरुणाईने पुन्हा एकदा जिद्दीचे, संस्कारांचे आणि देशप्रेमाचे अद्वितीय उदाहरण घालून दिले आहे. आपल्या स्वप्नासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या, आई-वडिलांच्या संस्कारांचा आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा पाया भक्कम ठेवत देशसेवेचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या कुमार अजिंक्य लिंबराज सुरवसे यांची भारतीय सैन्यात झालेली निवड म्हणजे रुईभर ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.



देशसेवेच्या या मोठ्या यशाचा सन्मान करण्यासाठी रुईभर ग्रामपंचायतीतर्फे तथा ग्रामस्थांच्या वतीने अजिंक्य सुरवसे आणि त्यांचे वडील लिंबराज भगवान सुरवसे यांचा श्रीफळ, हार आणि शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतमातेच्या सेवेसाठी गावकऱ्यांनी दिलेल्या मनःपूर्वक शुभेच्छांनी वातावरण देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेले.

या अनोख्या व प्रेरणादायी कार्यक्रमासाठी सरपंच भगीरथ भैय्या लोमटे, उपसरपंच प्रमोद कोळगे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वडवले, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ विनोद पडवळ, नंदकुमार चव्हाण, मनोज तिर्थकर, मुकुंद लोमटे, दत्ता जाधव, फुलचंद वडवले, अभिमान लोमटे, शेरखाने भैय्या आदींची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

गावातील युवकाने भारतीय सेवेतील आपली निवड पक्की करताच गावभर आनंदाची लहर उसळली. तरुणांच्या प्रेरणास्थानी ठरलेल्या या क्षणाने रुईभर ग्रामपंचायतीचा उपक्रम अधिकच कौतुकास्पद ठरला आहे.

➡️ अजिंक्य सुरवसेच्या देशसेवेच्या प्रवासाला रुईभर ग्रामस्थांकडून मनःपूर्वक शुभेच्छा — 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या