Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

*जिल्हा व्यापारी महासंघ,सावित्रीबाई फुले संस्था,प्रेरणा संस्था व स्वतंत्र मजुर सामाजिक संस्थेच्या वतीने संविधान जनजागृती रॅलीत खाऊचे वाटप..*


 *जिल्हा व्यापारी महासंघ,सावित्रीबाई फुले संस्था,प्रेरणा संस्था व स्वतंत्र मजुर सामाजिक संस्थेच्या वतीने संविधान जनजागृती रॅलीत खाऊचे वाटप..*
धाराशिव :- भारतीय संविधान दिन व भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव,शिक्षणाधिकारी,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग धाराशिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव आणि मतदार जनजागरण समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली,रॅलीत सहभागी शाळा नर्सिंग कॉलेज विद्यार्थी यांना जिल्हा व्यापारी महासंघ,सावित्रीबाई फुले सामाजिक संस्था,प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व स्वतंत्र मजुर युनियन सामाजिक संस्थेच्या वतीने बिस्किटे,मोतीचुर लाडु, राजगिरा लाडू,केळी देऊन खाऊचे वाटप करण्यात आले,दरवर्षी संविधान दिनानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात येते, भारतीय संविधान दिन हा राष्ट्रीय सण उत्सव असुन हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव,संजय मंत्री अमित मोदाणी,अझहर शेख,सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव भोसले,प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ.किरणताई निंबाळकर,युनिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद भालेराव यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रॅलीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले, यावेळी मतदार जनजागरण समितीचे अध्यक्ष एम डी देशमुख,सचिव अब्दुल लतीफ, कार्याध्यक्ष गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष शेख रौफ,सहसचिव बाबासाहेब गुळीग,उपाध्यक्ष सचिन चौधरी,सल्लागार बलभीम कांबळे,सदस्य श्रीकांत मटकिवाले,अमर आगळे सह समाज कल्याण विभाग,शिक्षण विभाग,विधी सेवा प्राधिकरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, मतदार जनजागरण समितीच्या वतीने एम डी देशमुख यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या