Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जयप्रकाश विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रीतम गव्हाणे यांची महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती


   
      जयप्रकाश विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रीतम गव्हाणे यांची महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती


रुईभर...प्रतिनिधी....मनोज जाधव 

जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील माजी विद्यार्थी प्रीतम चंद्रकांत गव्हाणे यांची महावितरण (विद्युत) विभागात विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशानिमित्त विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे म्हणाले,

“विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची परंपरा आपल्या संस्थेत आहे. प्रीतमने आपल्या घरातील अडचणींवर मात करत सातत्याने परिश्रम घेऊन हे यश मिळवले आहे. भविष्यातही तो आपल्या कार्याचा ठसा उमटवेल, अशी आम्हाला खात्री आहे.”


प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले,

“परीस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी प्रयत्न आणि परिश्रम यांच्या जोरावर मोठी उद्दिष्टे साध्य करता येतात, याचे प्रीतम हे उत्तम उदाहरण आहे. आजचे युग स्पर्धेचे असून त्यात टिकण्यासाठी कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाची आवश्यकता आहे.”


कार्यक्रमाला डॉ. आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे, माजी जि. प. सदस्य रामदास अण्णा कोळगे, माजी ग्रा. प. सदस्य राजनारायण कोळगे, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. गणेश शेटे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या