भाजप युवा नेते अशोक देवगुंडे यांना मातृशोक; सुरेखा उर्फ अबू देवगुंडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन
तुळजापूर | प्रतिनिधी : राम थोरात
तुळजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रभागी असणाऱ्या सुरेखा उर्फ अबू देवगुंडे यांचे काल सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्या भाजपचे युवा नेते अशोक देवगुंडे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
सुरेखा देवगुंडे यांनी अंगणवाडी सेविका म्हणून अनेक वर्षे जबाबदारीने काम करत शेकडो चिमुकल्यांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. बालकांच्या संगोपनासोबतच कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत त्यांनी संस्कारांची पायाभरणी केली.
नेहमी हसतमुख, मृदू स्वभाव आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्या गावात सर्वांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करून गेल्या. मात्र काल अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे देवगुंडे कुटुंबासह संपूर्ण तुळजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी कुटुंबीय व गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवगुंडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण परिसरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.


0 टिप्पण्या