जयप्रकाश विद्यालयात पदोन्नती निमित्त सत्कार समारंभ संपन्न...
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
रुईभर :- जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर, ता. जि. धाराशिव येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल पदी पदोन्नती झाल्यामुळे सत्कार समारंभ संपन्न झाला.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री उदय पवार, श्री बालाजी जाधव, श्री नितीन जाधवर (LCB ) यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलीस सेवेत 2010 साली रुजू झाले होते. आपल्या कार्यात सतत कार्य मग्न राहून सेवा करत असतात. या सर्वांची पोलीस हेड कॉन्स्टेबल पदी पदोन्नती झाल्यामुळे डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण बप्पा कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, पर्यवेक्षक श्री काकासाहेब डोंगरे, शिक्षकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री सचिन कांबळे यांनी मानले.
0 टिप्पण्या