जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रूईभरचे Jr. I.A.S. परीक्षेत घवघवीत यश...
प्रतिनिधी... शहाजी आगळे...
जि प कें प्रा शाळा रूईभर या ठिकाणी ज्युनियर IAS हे शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेच्या आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा परीक्षेत अवंतिका काकडे इ 1ली राज्यात 50 व्या क्रमांकाने उत्तीर्ण, साईराज घोडके इ 3री राज्यात 33 व्या क्रमांकाने उत्तीर्ण, आशिया शेख इ 3 री राज्यात 54 व्या क्रमांकाने उत्तीर्ण, कार्तिक शेळके इ 4 थी राज्यात 43 व्या क्रमांकाने उत्तीर्ण व शुभ्रा माळी इ 4 थी राज्यात 52 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक पवार पी. एस., सहशिक्षक भोसले बी. के. व सहशिक्षक सर्जे ए. एम. यांनी शाळा स्तरावर मार्गदर्शन केले असून सर्व शिक्षकांना विस्ताराधिकारी श्रीम. जयमला शिंदे यांनी प्रोत्साहित केले . सदरील सर्व पाच विद्यार्थी सर्व शिक्षक व अधिकारी यांचे ग्रामपंचायत रूईभर यांच्यातर्फे फेटा श्रीफळ हार व गुच्छ देऊन 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सत्कार करण्यात आला .
यावेळी गावचे सरपंच सौ कल्याणी भगीरथ लोमटे , उपसरपंच श्री संतोष सौदागर वडवले , ग्रामविस्तार अधिकारी श्री कुंभार पी डी शालिय समितीचे सदस्य श्री सचिन माळी माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य श्री भगीरथ राजेंद्र लोमटे तसचे पालाक व गावातील ग्रामस्थ श्री छत्रपती चव्हाण ,पारवे महादेव ,घोडके बालाजी, आयुब पठाण, मयुर कुलकर्णी लोमटे सुनिल भोयटे ,शिवाजी , सोपान निंबाळकर लोमटे आप्पा , जगताप पंडित , मते बळीराम आणि ग्रामपंचायत कर्मचारी हे सर्व उपस्थित होते.
0 टिप्पण्या