*ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे*
*गोडवा डेअरी व बेकरी एक्स्पो – २०२५*
प्रतिनिधी....मनोज जाधव
महा डेअरी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने व गोडवा प्रकाशनच्या सहकार्याने दि. २० ते २२ डिसेंबर २०२५ दरम्यान १२ वे गोडवा डेअरी व बेकरी एक्स्पो २०२५ तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे – ४११०५२ येथे होणार आहे.
या राष्ट्रीय प्रदर्शनात देशभरातील १३५ हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार असून डेअरी फार्मिंग, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, पशुखाद्य, बेकरी, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक मशिनरी, उपकरणे व सेवा यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील लघु ते मोठ्या दुग्ध व्यावसायिकांना उद्योजक बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध मशिनरी व तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळणार आहे. यामध्ये दूध तपासणी यंत्र, बल्क मिल्क कूलर, खवा मेकिंग मशीन, क्रीम सेपरेटर, होमोजिनायझर, मिल्क पाश्चरायझर, स्टीम बॉयलर, सी.आय.पी. सिस्टीम, घी बॉयलर, शीतगृह उभारणी, डिस्ले डिप्ले, पॅकिंग मशिनरी व कोल्ड चेन यंत्रणा यांचा समावेश आहे.
तसेच डेअरी फार्मिंग, डेअरी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स, डेअरी ट्रेनिंग, बेकरी ओव्हन्स, फूड प्रोसेसिंग मशिनरी, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, जनरेटर आणि फळभाज्यांचे प्रक्रिया उद्योग यासंबंधी स्टॉल्सही उपलब्ध असणार आहेत.
या प्रदर्शनात डेअरी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, ऊर्जा बचत उपाय, अन्नसुरक्षा कायदे व मानके, दुग्ध प्रक्रिया तंत्रज्ञान, जागतिक संधी व व्यापार विषयक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रांमध्ये दुग्ध उद्योगातील अडचणी व त्यावरील उपायांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे.
रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता महालक्ष्मी लॉन्स येथे विशेष समारंभात डेअरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजक, दुग्ध


0 टिप्पण्या