प्रतिनिधी...मनोज जाधव
सुरक्षा समितीची बैठक संपन्न..
धाराशिव :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे सुरक्षा समितीची मासिक आढावा बैठक व दि.१५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली, यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव, महिला रुग्णालय धाराशिव येथील सुरक्षितता विषयी चर्चा करण्यात आली.तसेच कार्यरत सुरक्षा एजन्सीचा आढावा घेण्यात आला,सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले पॉईंट्स निश्चितीसाठी,सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली सुरक्षा रक्षकांची संख्या निक्षित करणे,त्यांचे कार्य सक्षमरित्या व्हावे जेणेकरून रेसिडेंट डॉक्टर व रुग्ण यांच्या सुरक्षेची आवश्यक खबरदारी घेतली जाईल याचे नियोजन व नियमित देखरेख करण्यासाठी चर्चा करण्यात आली.सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांचे व त्यांच्याविरुद्ध येणाऱ्या विविध तक्रारीचे निवारण करणे,महिन्यातुन एक वेळा सुरक्षा रक्षकांचा परेड घेऊन त्यांना आवश्यक सूचना देणे.महिन्यातून एक किंवा दोन वेळा आकस्मितरित्या भेट देऊन सुरकारक्षक आपापल्या जागेवर आपली डयुटी करतात का अशा बाबीवर चर्चा करण्यात आली,तर तंबाखू गुटखा रुग्णालय आवारात खाणारे रुग्ण नातलग,कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई भरती प्रकाश टाकण्यात आला,यावेळी समितीचे अध्यक्ष,प्राध्यापक तथा विभाग प्रमुख,न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ.विश्वजीत पवार,अधिसेविका सुमित्रा गोरे,सहाय्यक अधिसेविका रिबेका भंडारे, सदस्य अब्दुल लतीफ, सदस्य गणेश वाघमारे,सदस्य श्री जावळे,कॉन्स्टेबल सदस्य, सिक्युरिटी गार्डचे सुपरवायझर आणि इतर सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या