सारथी संस्थे मार्फत चालणाऱ्या सर्व योजनेची माहिती देणारी कार्यशाळा संपन्न...
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पळसवाडी, वरुडा, वडगाव (सिद्धेश्वर) या
गावातील ग्रामपंचायतीत MKCL मार्फत CSMS-DEEP अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांद्वारे सारथी योजनांबद्दल एक महत्वाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सारथी ही संस्था मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी काम करते
या कार्यशाळेतील मार्गदर्शक म्हणून सारथी कोर्सच्या विद्यार्थिनी साक्षी सुर्वे, तनुजा ढवळे, हर्षदा रोटे रोहित कोळगे, समर्थ अवचार, ज्ञानेश्वर खरडे, आर्यन यांनी उपस्थितांना सारथी योजनांच्या विविध लाभांविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सारथी योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, आणि या योजनांचा योग्य वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि विविध योजनांचा लाभ कसा मिळवावा याबद्दल प्रश्न विचारले. लाभार्थी विद्यार्थ्यांनी त्यांना योजनेसंबंधी अधिक सुस्पष्ट माहिती देत, त्याचा कसा उपयोग करावा हे शिकवले.
या कार्यशाळेचा उद्देश ग्रामीण नागरिकांमध्ये सारथी योजनांची जागरूकता वाढवणे आणि त्यांना त्यांचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे होता.
हा कार्यक्रम सारथी प्रशिक्षण केंद्र आयडीयल कॉम्प्युटर इन्स्टिटय़ुट चे संचालक लहु भानवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
0 टिप्पण्या