प्रभाग 5-अ मध्ये राजकीय भूकंप! चव्हाण बंधूंचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा; विरोधकांच्या गणितात खळबळ
प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव : धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5-अ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. प्रभागातील प्रभावी मानल्या जाणाऱ्या श्री. गोविंद खेमराज चव्हाण व रामेश्वर गोरख चव्हाण यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी शिवसेना उमेदवार लखन दशरथ मुंडे व सौ. प्रेमा सुधीर पाटील यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र देत राजकीय समीकरणांचे तारेच बदलून टाकले आहेत.
दोन्ही नेत्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना "आम्ही व आमचे सहकारी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहोत; तुम्हाला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी जिवाचे रान करू" अशी ठाम ग्वाही दिली.
या अनपेक्षित आणि प्रभावी पाठिंब्यामुळे प्रभागातील संपूर्ण राजकीय वातावरणच ढवळून निघाले असून, विरोधकांच्या खंदकात चिंतेची लाट पसरली आहे. मतदारसंघातील आतापर्यंतचे सर्व राजकीय गणित बिघडल्याचे बोलले जात असून, चव्हाण बंधूंच्या या पावलाचा शिवसेनेच्या उमेदवारांना कितपत लाभ होणार आणि विरोधकांची डोकेदुखी किती वाढणार, हे येणारा काळ ठरवणार आहे.


0 टिप्पण्या