राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सुचनांचे निवेदन
मुख्य संपादक.....मनोज जाधव 9823751412
धाराशिव :- दि 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रशासनाच्या कार्यक्रमात मतदार जनजागरण समितीला निमंत्रित केले जाते,छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल येथे कार्यक्रम घेण्यात आला, शाळेतील विद्यार्थ्यांची मतदार जनजागरण रॅली काढण्यात आली,या रॅलीचे उद्घाटन तहसिलदार मृणाल जाधव व शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.समितीच्या वतीने निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांना तहसीलदार मृणाल जाधव यांच्या हस्ते मतदार व मतदान बाबतीत सुचनांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हण्टले आहे की,आज रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होत आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही आपणाकडे मतदार व मतदाना विषयी विनंती सुचनांचे निवेदन व राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुभेच्छा देत आहोत.नुकत्याच लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या,या दोन्ही निवडणुका आपण यशस्वी व शांतता पुर्ण वातावरणात पार पाडल्या.देशाला सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही,गणराज्य, घडविण्याचा महत्त्वपुर्ण अधिकार मतदाराला आहे त्यामुळे मतदारांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवुन आपल्या मतदानाच्या अधिकाराने देशाला लोकशाहीच्या परंपरेला जतन करणे आणि मुक्त निपक्षपाती व शांततापुर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखुन प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म,वंश,पंत,जात,समाज, वर्ण,भाषा,आमिष,दडपण, दबाव यासारख्या बाबीच्या प्रभावाखाली न येता आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावत राहावा हीच विनंती मतदारांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या माध्यमातुन देत आहोत,धाराशिव जिल्ह्यातील निवडणुक प्रक्रियेत नियंत्रण ठेवण्याकरिता आपल्याकडुन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी ही अपेक्षा आहे, निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून काही बाबी आम्ही देत आहोत.त्या बाबी निवडणुक आयोगाने अमलात आणाव्यात त्या खालील प्रमाणे..
1) स्मार्ट कार्ड (फायबर) मतदान ओळखपत्र बऱ्याच मतदारांना मिळाले नाहीत ते मिळावेत.
2) दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदानाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.
3) मतदान केंद्रावर कर्तव्य बजाविणाऱ्या अधिकाऱ्यास मतदान केंद्रातील प्रशिक्षण परिपुर्ण द्यावे त्यामुळे मतदारांची हेळसांड होणार नाही.
4) मतदान यंत्राद्वारे मतदान केल्यानंतर छापील पावती देण्याची व्यवस्था करण्यात यावी.
5) मतदान ओळखपत्र ओळखपत्र आधार कार्ड लिंक करावे यामुळे मनुष्यबळाची संख्या कमी होऊन पोलिंग एजंट नेमण्याची गरज राहणार नाही.
6) दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत येण्या-जाण्याची व्यवस्था प्रशासनाकडुनच करण्यात यावी.
7) निवडणुक केंद्रावर मतदार आणि प्रशासकीय कर्मचाऱ्याशिवाय इतरांना प्रवेश देण्यात येऊ नये.
8) प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन मतदान प्रक्रियेवर निरीक्षण ठेवण्यात यावे.
9) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यकाल संपला असुन संविधानिक निवडणुका होणे गरजेचे आहे.
10) मतदाराकडे मतदान ओळखपत्र असतांना मतदार यादीत नाव सापडत नसल्याकारणाने मतदार मतदानापासुन वंचित राहिले जातात त्यामुळे मतदान केंद्रावरच मतदान ओळखपत्र आधारे मतदान यादीत नाव समक्ष समाविष्ट करून घेण्यात यावे.
11) निवडणुक केंद्रावर प्रशासकीय कर्मचाऱ्यात पुरुषांच्या संख्येबरोबर महिला वर्गाची समसमान नेमणुक करण्यात यावी.
12) मतदान केंद्रात मोबाईल बंदी घालण्यात येते परंतु त्याचे पालन होत नाही,सर्व सामान्य मतदारांना बंधन असते परंतु पक्ष पार्टीतील कार्यकर्ते,नेते हे सर्रासपणे याचे उल्लंघन करतात.
13) मुला मुलींचे वय १८ वर्षं पुर्ण झाल्यानंतर मतदार म्हणुन नोंद होणे गरजेचे आहे.
या सर्व बाबी आदर्श आचारसंहितेच्या कक्षात अमलात आणल्या गेल्यास मतदान सुलभ जलद व निर्भयपणे होऊन मतदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल वरील मागण्या आपल्या माध्यमातुन मुख्य निवडणुक आयोगाला कळवाव्यात आणि निपक्षपातीपणे निवडणुक पार पाडुन जगात आपल्या देशाचा नावलौकिक वाढवुन एक आदर्श निर्माण करुन पारंपारिक प्रक्रियेला पूर्णविराम द्यावा अशा प्रकारचे लेखी निवेदन तहसीलदार मृणाल जाधव यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ओम्बासे यांना देण्यात आले.यावेळी अध्यक्ष एम डी देशमुख, सचिव अब्दुल लतिफ, कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,उपाध्यक्ष संजय गजधने,उपाध्यक्ष सचिन चौधरी,सहसचिव बाबासाहेब गुळीग,कोषाध्यक्ष रऊफ शेख,सल्लागार बलभीम कांबळे,सदस्य दिपक पांढरे,सलीम शेख,आयुब पठाण,राजेंद्र धावारे,सिद्राम वाघमारे सह विस्तार अधिकारी भारत देवगुडे,श्री काझी,मुख्याध्यापक कचरु घोडके,आनंद विर,दिक्षीत सर, प्रा.रवि सुरवसे सह मतदार जनजागरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या