धाराशिव तहसील कार्यालयाने जपली माणुसकी......
सुट्टीच्या दिवशीही दवाखान्यासाठी आवश्यक असलेले दिले प्रमाणपत्र....
प्रतिनिधी...शहाजी आगळे
पुरवठा विभाग रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या कागदपत्रात सदैव तत्पर....
त्याचे झाले असे की धाराशिव तालुक्यातील वरुडा या गावातील महादेव शामराव पवार यांचा खुब्यातून हात मोडल्याने त्यांना उपचारासाठी धाराशिव शहरातील बाराते एक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर महात्मा फुले योजनेतून मोफत ऑपरेशन करण्यासाठी त्यांना रेशन कार्ड नसल्याने अडचणी येत होती त्यांची ही अडचण सदरील हॉस्पिटलचे डॉक्टर विकास बाराते यांनी रुग्णसेवक मनोज जाधव यांना फोन करून सांगितली असता मनोज जाधव यांनी रविवार असतानाही पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्री बालाजी ढवन साहेब यांना फोनवरून विनंती केली असता त्यांनी रविवारी ही सुट्टीच्या दिवशी कार्यालयात येऊन महात्मा फुले योजनेचे प्रमाणपत्र दिल्याने त्या पेशंटचा योजनेमधून लाभ घेण्यासाठी मार्ग मोकळा झाला या कामासाठी मनोज जाधव यांना पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्री बालाजी ढवन साहेब व त्यांचे सहकारी श्री अमित बंडगर साहेब तसेच ओमकार पवार व अक्रम मनेर तसेच श्री सिद्धेश्वर लोंढे परमेश्वर काकडे व सचिन पिसे या सर्वांचे सहकार्य लाभले यांच्या सहकार्यानेच त्या पेशंटचे योजनेमधून उपचार घेण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्याने मनोज जाधव यांनी तहसील कार्यालय यांच्या बाबतीत व यांच्या कामाच्या बाबतीत समाधान व्यक्त केले...
0 टिप्पण्या