*फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभा रॅलीचा समारोप.. नाश्ता, फळांची व्यवस्था..*
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
धाराशिव :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील शोभा रॅलीत सहभागी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत नाश्त्याची सोय करण्यात आली होती.या रॅलीत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.मध्यवर्ती शिवजयंती जन्मोत्सव मंडळा तर्फे करण्यात आलेल्या आयोजित कार्यक्रमात रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आली होती, त्यापैकी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत विद्यार्थ्यांना राईस,केळी, बिस्किटे व पाणी वाटप करण्यात आले,विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सामील होऊन या नाष्ट्याचा आनंदाने आस्वाद घेतला, सुरुवातीला फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस प्रकाश जगताप, संदिप भैय्या इंगळे,आशिष मोदानी,अभय इंगळे,राजसिन्हा निंबाळकर सह इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन वंदन करण्यात आले तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे संचालक प्रकाश जगताप व जयंतीचे अध्यक्ष संदीप भैय्या इंगळे,प्रा.अभिमान हंगरगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन भारतीय संविधान उद्देशिकाची प्रतिकृती व माता रमाई यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आले, समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम घेण्यात येतात.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाचे संचालक प्रकाश जगताप,अध्यक्ष संदीप इंगळे,प्रा.अभिमान हंगरगेकर,नितिन काळे, राजाभाऊ शेरखाने,आशिष मोदानी,अभय इंगळे,राजसिन्हा निंबाळकर,उमेश राजे निंबाळकर, अग्निवेश शिंदे,प्रशांत पाटील, धनंजय राऊत,आनंद जगताप, अभिजीत देडे,फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे पदाधिकारी माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, गणेश वाघमारे,संजय गजधने प्रवीण जगताप,संग्राम बनसोडे, पुष्पकांत माळाळे,मेसा जानराव, स्वप्नील शिंगाडे,अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे, बाबासाहेब बनसोडे,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,अतुल लष्करे,श्रीकांत गायकवाड,रविंद्र शिंदे,आनंद भालेराव, अनिल वाघमारे, राहुल राऊत,अमोल वाघमारे,कैलास शिंदे,बालाजी झेंडे सह इतर उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रमातुन शिवाजी महाराज यांना अभिवादन केले जात आहे,सर्वं जाती धर्माचे लोक यात सहभागी होतात तर आज रोजी झालेल्या सामाजिक उपक्रमात बौध्द समाज बांधवांनी सामाजिक सलोखा एकता राखण्याचे आदर्शवत संदेश समोर ठेवला आहे असे मनोगत सिध्दार्थ बनसोडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांनी मिळून सहकार्य केले याबाबत गणेश वाघमारे यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या