*मायेची उब देणाऱ्या सह्याद्री अंकुर शिशुगृह प्रकल्पास आवर्जुन एकदा भेट द्या..* गणेश वाघमारे.
धाराशिव :- परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही परंतु गर्भात वाढणारा एक कोमल जीव जेव्हा हे जग पाहण्यासाठी जन्म घेतो तेव्हा त्यास काय माहित असणार आईबाप बहिण भाऊ मित्र हे जग त्याला स्वीकारणार का नकार देणार हे कोणास ठाऊक ..? अनैतिक संबंध असतील या नकळत झालेल्या शारीरिक संबंधातुन जन्मास येणारा हा निष्पाप जीव जेव्हा या जगात डोकावतो तेव्हा मात्र हे जग त्याला अनेक नजरांनी पाहते व जन्म देणाऱ्या त्या मातेला संकुचित नजरेने बघते तेव्हा ती माता एक विचित्र अशा अवस्थेतुन मार्ग काढत असते आणि नकळत जन्म देणाऱ्या त्या गोंडस बाळाला कुठे मंदिरात कुठे मज्जिद समोर या रस्त्याच्या कडेला कचऱ्यामध्ये सोडुन मोठ्या आंक्रांताने निघुन जाते.तर काही रुग्णालयात अशाच जन्म दिलेल्या बालकांना तिथे सोडुन निघुन जातात..हि परिस्थिती आपण पाहतो,ऐकतो तेव्हा दोष त्या मातेला देतो व एका कोवळ्या जीवाला कोणी सोडले असे नाना त-हेचे आरोप संवाद करुन चितडे उडवितो,मग अशा बालकांचे संगोपन कोण करणार हा मोठा प्रश्न आपल्या सर्वसामान्यांना पडतो मात्र शासन अशा बाबीकडे गांभीर्याने पाहते नकोशा असलेल्या बालकांना ते मायेचा आधार देण्याचा प्रयत्न बाल व महिला विकास विभागाच्या वतीने करते आणि मानवता म्हणुन काही संस्था संघटना समोर येतात आणि या नकोशा असलेल्या बालकांना मायेची ऊब देतात,यातील एक म्हणजे धाराशिव येथील सह्याद्री अंकुर शिशुगृह होय.या विशेष दत्तक संस्थांच्या माध्यमातुन झिरो वय असलेले बालकांपासुन ते सहा महिने पर्यंतच्या बालकांचे संगोपन करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत,बाळांची काळजी येथील आया मावशी अगदी स्वतःच्या बाळासारखी घेतात,या भावनाशील वातावरणात ती अपरिचित बाळे त्याच आया मावशांच्या मायेच्या कुशीतुन उद्याच्या जगात जगण्यासाठी डोकावतांना दिसतात तर याला बळ देण्याचे काम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रमेश दापके व सचिव डॉ दिग्गज दापके सह इतर करीत आहेत,येथील व्यवस्थापन गजानन पाटील अगदी चांगल्या पद्धतीने करीत असुन या शिशुगृह प्रकल्पास अनेक मान्यवर,नागरिक, विद्यार्थी,महिला भगिनी,महिला मंडळाच्या वतीने भेटी देऊन त्या बाळांसमवेत वेळ घालवित आहेत.आपणही आपल्या घाई गडबडीतुन काही वेळ काढुन या निष्पाप बालकांसाठी वेळ द्या,वाढदिवस, मंगल परिणय दिन विविध साजरे करणारे कार्यक्रम या शिशुगृहात जाऊन त्या बाळांसोबत साजरे करा,निमित्त कोणते का असेना तिथे आपले एक पाऊल पुढे टाकुन त्या बालकांना काही काळ मायेची ऊब,सावली द्या,काही काळ काही क्षणीक तरी त्यांचे माता पिता,भाऊ बहिण,आज्जी आजोबा बना,मित्र बना.. निर्लज्ज असेल या परिस्थितीने नाकारलेल्या अपरिचित मातेच्या नकोशा बाळाला प्रेमाने आपला भावनिक साद देऊन मायेचा स्पर्श करा..जीवन क्षणभंगुर आहे मानवता निरंतर आहे हिच भावना मनात ठेऊन नकोशा बालकांचे स्वागत करुया,धाराशिवातील सह्याद्री अंकुर शिशुगृहात.
गणेश रानबा वाघमारे.
सामाजिक कार्यकर्ता तथा
सदस्य,तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती धाराशिव महाराष्ट्र राज्य.
0 टिप्पण्या