वर्ग मित्रांनी एकत्र येत केला आपल्या मित्राचा सत्कार....
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
त्याचे झाले असे की सन 1996-97 या वर्षी दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेत असताना आपल्या वर्गातील सर्व मित्र आणि मैत्रिणी आपल्या आपल्या करिअर साठी वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या पदावर विराजमान झाले...परंतु त्यांच्याच वर्गातील संतोष वडवले आणि अशोक पवार तसेच उर्मिला कदम लोमटे पाटील या तीन अवलिया मित्रांनी सोशल मीडियाचा वापर करून सर्वच मित्र आणि मैत्रिणींना एकत्र आणले आणि मग काय सुरू झाला आपल्या वर्गातील मित्रांचा पुन्हा एकदा शाळेसारखाच गोंधळ पण फक्त शाळे सारखं गोंधळ न घालता या तीन मित्रांनी आपल्या वर्गातील जे मित्र किंवा मैत्रीण सध्या समाजात वावरत असताना समाजाला दिशा देण्याचे काम करतात त्यांचा भेटून मान सन्मान करायचा आणि आपल्या ग्रुप च पण समजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याची किमया या ग्रुप ने करून दाखवली आणि आज पुन्हा एकदा वर्गातील एक मित्र श्री विक्रम नरसुडे हा डेपुटी मॅनेजर म्हणून स्पेशालिटी इन्डस्ट्रीयल पॉलीमिअर्स अॅन्ड कॉटिंग् स प्रा.लि. एम आय डी सी , महाड, जिल्हा रायगड येथे या उच्च पदावर कर्यकरत आहे हे समजताच त्याचा यथोचित सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या....या वेळी मात्र त्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली....या वेळी संतोष वडवले,अशोक पवार,नबी सय्यद,दत्ता जमदाडे,महेश कुलकर्णी,सुशील पवार,सुनील पवार,आदी मित्र हजर होते....ज्या तीन मित्रांनी सर्वांना एकत्र आणले आणि या ग्रुप च्या वतीने जो उपक्रम राबविला जात आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे असून या ग्रुप प्रमाणे इतरांनाही प्रेरणा घ्यावी आसं काम या ग्रुप ने केले असल्याचे देखील समोर येत आहे....
0 टिप्पण्या