विद्यालयातुन मिळणाऱ्या ज्ञानातुन भविष्य उज्ज्वल करा - श्री विक्रम नरसुडे
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
रुईभर :- दि ४ फेब्रुवारी रोजी - व्यक्ति कितीही मोठ्या पदावर विराजमान होवू द्या आपल्या लहाणपणातील दिवस कधीही विसरू शकत नाहीत. मी या विद्यालयाचा सन १९९६-९७ चा इ.१०वी तील विद्यार्थी होतो. अगदी तेव्हापासुनच्या आठवणीना उजाळा म्हणून आज विद्यालयात येण्याची इच्छा झाली. या शाळेतुन मिळालेले ज्ञान माझे आयुष्य बदलण्यास मोठे योगदान आहे. वर्गातील अनुभव जीवनात बरेच काही देवून जातात. आपल्या संस्थेच्या अध्यक्षा पासुन ते शिपायापर्यंत कार्य करण्याची पद्धत आजही भावते. अशा कर्तव्यनिष्ठेने भरलेल्या शाळेतील सर्व गुरूजनांचे मार्गदर्शन हे जीवनाला चांगले वळन लावून दिले. अभ्यासाच्या पध्दती , क्रिडा क्षेत्रातील यश यातील अनुभवातुन जीवन जडन घडनीत भर पडली आहे.विद्यार्थी दशेत मिळणारे ज्ञान हे अनमोल समजुन आपले भाविष्य उज्ज्वल करावे अशी अपेक्षा विद्यालयाचे माजी विद्यार्थी विक्रम नरसुडे डेपुटी मॅनेजर म्हणून स्पेशालिटी इन्डस्ट्रीयल पॉलीमिअर्स अॅन्ड कॉटिंग् स प्रा.लि. एम आय डी सी , महाड, जिल्हा रायगड येथे उच्च पदावर असुन देखील वेळात वेळ काढुन विद्यालयातील जुण्या आठवणींना उजाळा देत विद्यालयास सदिच्छा भेटीत सत्कार समारंभप्रसंगी जयप्रकाश माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय , रुईभर येथे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व डॉ आबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे होते.
प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनीही विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की जीवनात जुण्या आठवणी व अनुभवाच्या बळावरच आपले भविष्य घडवले पाहिजे. लहानपणापासूनच काहीतरी करण्याची इच्छा ठेवून जीवनमार्ग निश्चित केला पाहिजे. आपणही मनामध्ये इर्षा ठेवून मन लावून अभ्यास करावा. मनातील सुसंस्कारपणाच आदर्श जीवन घडवत असतो. आज आपल्या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभातून बरेच काही घेण्यासारखे आहेत. आपणही जीवनात मोठ्या पदावर विराजमान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
रुईभरचे उपसरपंच संतोष वडवले यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण घरी, शाळेत किंवा रस्त्यावरून जात असताना शिस्तिचे पालन करून जीवन शिस्तप्रिय बनवावे अशी अपेक्षा व्यक्त केले.
याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्राप सदस्य राजनारायण कोळगे, अशोक पवार, सुशील पवार, सुनील पवार, नबी सय्यद, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन कांबळे व आभार श्री गणेश शेटे यांनी मानले.
0 टिप्पण्या