जयप्रकाश विद्यालयाची माजी विद्यार्थिनी लोखंडे अनिशा यांची धाराशिव पोलीस चालक पदी निवड
मुख्य संपादक....मनोज जाधव 9823751412
रुईभर : -दि 2 फेब्रुवारी 2025 जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रूईभर येथील कला शाखेची अनिशा लोखंडे या विद्यार्थिनीची धाराशिव पोलीस चालक पदी निवड झाली. पोलीस चालक पदासाठी झालेल्या परीक्षेत अनिशा लोखंडे यांनी यश संपादन केले. जिद्द,चिकाटी व कठोर परिश्रमातून धुत्ता ग्रामीण भागातील लोखंडे यांनी आपले यश संपादन केले. लोखंडे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते शाॅल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी माजी जि सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे,महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे , जयप्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक जयप्रकाश कोळगे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या