कायदा, सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणार - सपोनि ठाकुर
मुख्य संपादक....मनोज जाधव 9823751412
तामलवाडी -
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिस ठाणे अंतर्गत येणार्या गावांमध्ये कायदा, सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तामलवाडी पोलिस ठाण्याचे नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी बोलताना सांगितले.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील पोलिस ठाण्यात नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी नुकताच पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर गोकुळ ठाकुर यांनी अडव्होकेट कोरे व गुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव येथे नविन कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम राबविला व नागरीकांना नविन कायदेविषयक माहीती सांगितली व मार्गदर्शन केले. तसेच डिजिटल विंग मिडीयाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक सर्जेराव गायकवाड, पत्रकार सुरक्षा समितीचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, शिवरत्न न्यूजचे दत्तात्रय भोसले, किसन पांडागळे यांनी नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा मानाचा फेटा घालून सन्मानपूर्वक स्वागत केले. यावेळी परीसरातील सामाजिक, राजकीय विषयावर चर्चा केल्यानंतर तामलवाडी पोलिस ठाणे अंतर्गत येणार्या गावांमध्ये कायदा, सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी आपण प्रयत्न करणार असुन विनाकारण कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे ठाकुर यांनी बोलताना सांगितले. तसेच परीसरातील नागरीकांनीही आपापल्या गावांमध्ये शांतता राखुन सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहनही यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी केले.
0 टिप्पण्या