प्रहार संघटनेच्या वतीने गणेश वाघमारे यांचा सत्कार...
प्रतिनिधी...शहाजी आगळे
धाराशिव :- नगर परिषदेच्या शहर उपजिविका आराखडा कृती समितीच्या अशासकीय सदस्य पदी गणेश वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी दिव्यांगासाठी लढणारे आमदार बच्चु भाऊ यांच्या वर लिहिलेले लेखक निलेश डावखरे व उध्दव ढवळे यांचे लोकनायक हे पुस्तक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच शहर उपजिविका आराखडा कृती समितीच्या दिव्यांग विभाग प्रतिनिधी म्हणुन मयुर काकडे यांचीही निवड झाल्याबद्दल मतदार जनजागरण समितीच्या वतीने त्यांना भारतीय संविधान उद्देशिकाची प्रत देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,जमीर भाई शेख,राज पवार सह इतर उपस्थित होते.
0 टिप्पण्या