Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..

फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..

प्रतिनिधी ...मनोज जाधव 9823751412

धाराशिव :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या व म ज्योतीबा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषदेच्या अधिनस्त व फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत जयंतीनिमित्त बैठक झाली,दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवुन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,दि.०७ एप्रिल रोजी स्वच्छता अभियान तर दि.११ एप्रिल ते दि.१४ एप्रिल पर्यंत महामानवाच्या कार्यप्रणालीवर चित्र प्रदर्शन,तथागत गौतम बुध्द यांच्या मुर्तीसमोर आकर्षक देखावा,गुणवंतांचा सत्कार,स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर,नेत्र,बिपी,शुगर तपासणी तर भोजनदानासह विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत,यात दि.११ एप्रिल रोजी म.ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम व शासकीय योजनांचा माहिती मेळावा आयोजित केला असुन या मेळाव्यात अनेक शासकीय कार्यालयांचा सहभाग असुन योजनेची माहिती दिली जाणार आहे,दि.१२ एप्रिल रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असून यामध्ये नेत्र बिपी शुगर तपासणी केली जाणार आहे,दि.१३ एप्रिल रोजी गुणवंतांचा सत्कार,दि.१४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम,भोजनदाना सह इतर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.या कार्यक्रमास दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक सह सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित राहणार आहेत,महामानवास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायीसाठी पाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, नागरिक या जयंती महाउत्सवात मोठ्या संख्येने सामिल होऊन जयंती उत्सव साजरा करतात अशी माहिती फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश वाघमारे यांनी सांगितले,यावेळी फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे अंकुश उबाळे,बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे, सिध्दार्थ बनसोडे,गणेश वाघमारे,संजय गजधने, प्रविण जगताप,संग्राम बनसोडे,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे,रमेश कांबळे,बाबासाहेब गुळीग,दिपक पांढरे, श्रीकांत गायकवाड,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे सह इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या