Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसचा धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा..*



*शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसचा धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा..

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

धाराशिव...केंद्रातील व राज्यातील माहिती सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने आज धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक (तुळजापूर नाका) येथे अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चामध्ये शेकडो शेतकरी आपापले ट्रॅक्टर घेऊन सामील झाले होते. छत्रपती शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला. मोर्चात सामील शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये खालील मागण्या सादर केल्या आहेत.
१) विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने कर्जमाफी सारखे अनेक आश्वासन दिली परंतु प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर विसर पडलेला दिसत आहे.
२) शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार होते त्याचे काय झाले?
३) मागेल त्याला सौर पंप अनेक शेतकऱ्यांनी नोंदी केल्या प्रतक्षात अजुन एकालाही मिळाला नाही .
४) रोजगार हमी योजना ची कामे चालू कधी होणार. ती तातडीने चालू करावीत.
५) तुळजापूर, तामलवाडी ड्रग्स प्रकरणात सखोल चौकशी करून पकडलेल्या आरोपीचे सी.डी.आर (CDR)तपासून कारवाई करावी.
६) ठिबक, तुषार सिंचनचे अनुदान अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते देण्यात यावे.
७)कृषी विभागा अंतर्गत अनुदानावर वाटप होणारे बी बियाणे व औषधे हे ठेकेदारा मार्फत खरेदी न करता शेतकऱ्यांना स्वतः खरेदी करण्याची परवानगी मिळावी.
८) वाहनांच्या नंबरप्लेटच्या माध्यमातून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे तिप्पट पट वाढ करण्यात आलेली आहे. ती वाढ कमी करून वाहनधारकाना दिलासा देण्यात यावा.

अश्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. या कारणास्तव शेतकऱ्यामधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज सोमवार दिनांक 3 मार्च पासून राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावेत या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. 
मोर्चामध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट धीरज पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, परंडा तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, भूम तालुकाध्यक्ष रुपेश कुमार शेंडगे, लोहारा तालुकाध्यक्ष राजू तोरकडे, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई सपाटे, जिल्हा परिषद माजी गटनेते प्रकाश आष्टे, माजी सदस्य प्रकाश चव्हाण, माजी सरपंच अशोक भाऊ पाटील, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उमेश राजेनिंबाळकर, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, भारतयात्री सरफराज काझी, कोषाध्यक्ष अशोक बापू शेळके, बेंबळीचे माजी सरपंच सत्तार भाई शेख, जिल्हा सचिव भूषण देशमुख, नानाराव भोसले, परंड्याचे माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, अमोल कुतवळ, सलमान शेख, अजय खरसडे, प्रेमानंद सपकाळ, सुनील बडूरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, प्रभाकर डोंबाळे, अमित रेड्डी, किसान काँग्रेसचे अध्यक्ष गौरीशंकर मुळे, अंकुश पेठे, संजय देशमुख, मोईज शेख, अतुल चव्हाण, सचिन धाकतोडे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
-----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या