परदेशात राहूनही भारतीय संस्कृती चे जतन... गायकवाड कुटुंब यांचा समाजात आदर्श निर्माण करणारा उपक्रम....
मुख्य संपादक...मनोज जाधव...9823751412...
मोहोळ येथील जयवंत जयप्रकाश गायकवाड हे सध्या अमेरिकेत वास्तव्यास असूनही त्यांनी भारतीय संस्कृती व माणुसकी जपली आहे...त्यांनी आज धाराशिव जिल्ह्यातील खानापूर येथील
नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय खानापूर व नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र खानापूर येथील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून दिनांक.02/03/2025 रोजी जिलेबी या स्वीट चे वाटप व दिनांक.03/03/2025 रोजी सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. जेवणामध्ये गुलाब जामून, पुरी भाजी, पापड, कोशिंबीर, राईस, दाल फ्राय, इत्यादी मेनूचा समावेश होता. ते आपल्या शाळेतील विशेष शिक्षिका श्रीमती. देशमुख मॅडम यांचे दीर आहेत. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केलेल्या अन्नदानाबद्दल नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय खानापूर व नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र खानापूर या दोन्ही शाळेच्या वतीने तर त्यांचे आभार मानले पण त्यांनी समाजातील वंचित असलेल्या घटकाला विचारात घेऊन जो अनोखा उपक्रम राबविला आहे त्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे...
यावेळी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की आपली भारतीय संस्कृती ही जगातील सर्व देशांतील संस्कृती मध्ये सर्व श्रेष्ठ संस्कृती असून आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी असलो तरी आपण आपल्या संस्कृतीला विसरू शकत नाहीत कारण आपली भारतीय संस्कृती ही मानवाला मानवता धर्मासाठी जगायचा आदर्श घालून देते आणि यामुळेच भारतीय लोकांना परदेशात सन्मान पूर्वक वागणूक मिळते असेही त्यांनी सांगितले....
0 टिप्पण्या