Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

अभ्यासासाठी तुम्ही दिलेला वेळ उद्या तुमची वेळ बदलेल - प्राचार्य जयप्रकाश कोळगे

अभ्यासासाठी तुम्ही दिलेला वेळ उद्या तुमची वेळ बदलेल - प्राचार्य जयप्रकाश कोळगे 

       रुईभर :- दि 2 एप्रिल - कोणतही कार्य परिश्रमाशिवाय पूर्ण होत नाही . मात्र प्रत्येक कामाची वेळ निश्चित असते जसे आपण विद्यार्थी दशेत आहात तुम्ही सर्वांनी अभ्यासाचे महत्त्व ओळखून अभ्यास कार्य पूर्ण केले पाहिजे. जर आज त्यासाठी वेळ नाही दिला तर भविष्यात आपण काही करू शकणार नाहीत. म्हणून आज अभ्यासासाठी तुम्ही दिलेली वेळ उद्या तुमची वेळ बदलणारी असेल असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे प्राचार्य जयप्रकाश कोळगे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
       पूढे म्हणाले की मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमातुन हे यश संपादन केले आहे. वेळोवेळी परीक्षेचे नियोजन, अभ्यासक्रमाचे नियोजन, यामध्ये सातत्य ठेवून विद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. पुढील वर्षी यापेक्षा जास्त शिष्यवृत्तीधारक बनतील याची ग्वाही देऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.       
        जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील एन. एम. एम. एस. (NMMS)सन - २०२४-२५ मध्ये कुमारी श्रद्धा ज्ञानेश्वर गुंड खुल्या प्रवर्गातून जिल्ह्यात १८वी असुन शिष्यवृत्तीधारक बनली आहे . 
        तसेच विद्यालयातील सारथी शिष्यवृत्तीसाठी ११ विद्यार्थी पात्र झाले आहेत. 
       या सर्व विद्यार्थ्यांचे डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी श्री दिलीप सुभाषराव कोळगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते फेटा, पुष्पगुच्छ देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.
          या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक NMMS विभाग प्रमुख श्री विनय सारंग, श्री डोंगरे के ए, श्री क्षीरसागर व्ही बी, श्री अभिजित घोळवे , श्री अमर कोळगे , श्री भिमराव कांबळे यांनी मौलाचे मार्गदर्शन केले.
            या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये गुंड श्रद्धा हिने एन एम एम एस मध्ये शिष्यवृत्तीधारक बनली आहे. तर सारथी शिष्यवृत्ती मध्ये - भोसले प्रांजली भीमराव,  गव्हाणे ईश्वरी अशोक, शिंदे अर्पिता राजेश, पवार अश्वमेघा धनाजी, पडवळ आर्या विनोद, पवार तुकाराम हनुमंत, लांडगे अपेक्षा प्रमोद, कोळगे सिद्धी सतीश, घोडके अविष्कार तानाजी, शिंदे सृष्टी सुधीर, सावंत समर्थ बाळासाहेब यांचे अभिनंदन करण्यात आले. 
         याप्रसंगी माजी जि प सदस्य श्री रामदास आण्णा कोळगे ,  माजी ग्रा प सदस्य श्री राजनारायण कोळगे , माजी सरपंच बालाजी कोळगे ,  प्रशासकिय अधिकारी श्रीमती शिवकन्या सांळुके , मुख्याध्यापक नानासाहेब शेलार , पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , धनंजय कोळगे , शिवाजी काकडे ,  शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपास्थित होते.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी तर आभार श्री विनय सारंग यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या