जयप्रकाश विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी
जयप्रकाश विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
रुईभर : - जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर ता. जि. धाराशिव येथील ०८ विद्यार्थी शिष्यवृत्तीस प्राप्त झाले असुन विद्यालयाने घवघवीत यश मिळाले आहे .
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे ०५ विद्यार्थी तर आठवीचे ०३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत .
विद्यालयातील शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी इयत्ता ५ वी तील ०५ विद्यार्थ्यी पात्र झाले यात १..कुमारी भोसले प्रणवी भीमराव ,२...कुमारी क्षिरसागर स्वराली प्रमोद ,३...कुमारी बारगुळे शिवांगी कल्याण , ४...कुमारी लोमटे आरोही अरुण ,५... कुमार चव्हाण संदेश आबासाहेब
तर इयत्ता ८ वी तील ०३ विद्यार्थी पात्र झाले १...कुमारी गुंड श्रध्दा ज्ञानेश्वर ,२... कुमार गडीकर शिवम गोंविद , ३...कुमारी कस्पटे अनुष्का गंगाराम हे यशस्वी विद्यार्थी आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना श्री सचिन कांबळे, श्री योहान वसावे, श्री अभिजीत घोळवे, श्री मोहन चव्हाण, श्री काकासाहेब डोंगरे , श्री विनय सारंग यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य श्री रामदास अण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य श्री राजनारायण बप्पा कोळगे, प्राचार्य श्री जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
0 टिप्पण्या