Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिल्हाधिकारी साहेबांनी खुश होऊन त्या लहान मुलीला दिली डायरी भेट...


 


     प्रतिनिधी....मनोज जाधव 


        त्याचे झाले असे की कै. चंद्रभान लोमटे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खेड  संचलित धीरूभाई अंबानी प्राथमिक  सेमी इंग्रजी माध्यम बालाजी नगर शेकापूर येथील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी कुमारी आरोही अण्णासाहेब पाटील ही तिच्या वडिलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक- 16/06/2025 वार सोमवार रोजी गेल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत इंग्रजी मध्ये संवाद  करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे, तसेच इंग्रजीमध्ये टेबल्स म्हणून दाखवले जिल्हाधिकारी साहेबांनी मुली सोबत  संवाद साधला व  त्या मुलीला डायरी देऊन तिचा सत्कार केला या कौतुकाबद्दल या मुलीच्या वर्ग शिक्षिका श्रीमती कुदळे मॅडम, मुलगी आरोही पाटील यांचे संस्था अध्यक्ष लोमटे सरांनी, मुख्याध्यापकांनी , सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या बालाजी नगर ,शेकापुर, वडगाव या गावातील लोकांनी मुलीचे कौतुक केले...

       यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आरोही ने सांगितले की मला आमचे शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच माझे आई-वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे बोलून दाखवले... व जिल्हाधिकारी साहेबांनी माझ्या पाठीवर जी शाबासकीची थाप टाकली आहे त्यातून मला एक प्रेरणा मिळाली असून येणाऱ्या काळात मी पण अशीच जिल्हाधिकारी होण्यासाठी गुरुजन वर्गांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचेही तिने यावेळी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या