प्रतिनिधी....मनोज जाधव
अंतरवली सराटी मध्ये काल झालेल्या मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकी नंतर मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते धाराशिव येथील धैर्यशील सस्ते यांना पुष्पहार घालून वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
मराठा आरक्षणाच्या लढ्यात अग्रस्थानी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील सक्रिय सहभागी असलेले कार्यकर्ते तथा मनोज दादा जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून आंदोलनात सर्वात पुढे असलेले धैर्यशील सस्ते हे काल अंतर्वली सराटी मध्ये मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीस हजर राहिले होते योगायोग असा की त्यांचा त्याच दिवशी वाढदिवस असल्याने बैठक झाल्यानंतर मनोज दादा जरांगे पाटील यांनी त्यांना पुष्पहार घालून वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कामाचे व कार्याचे भरभरून कौतुक केले तसेच येणाऱ्या काळात त्यांच्या हातून मराठा समाजासाठी चांगल्या प्रकारे कार्य घडो अशी अशा व्यक्त केली...
मनोज दादा यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने जनतेत धैर्यशील सस्ते यांचा सन्मान वाढल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत होते
0 टिप्पण्या