Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मराठा सेवा संघ धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष पदी विजय बप्पा पवार यांची निवड



     प्रतिनिधी....मनोज जाधव 


धाराशिव (प्रतिनिधी) – मराठा सेवा संघाच्या धाराशिव  जिल्हा कार्याध्यक्ष पदी विजय बप्पा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे...


मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारी व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक स्तरावर कार्यरत असलेली मराठा सेवा संघ ही अग्रगण्य संघटना असून, धाराशिव जिल्ह्यात तिच्या कार्याचा विस्तार करण्याची जबाबदारी आता विजय पवार यांच्या खांद्यावर आली आहे.


विजय बप्पा पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असून, युवकांमध्ये प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीनंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


या वेळी बोलताना विजय पवार यांनी सांगितले की, "मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे. संघटनेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन."



या निवडीमुळे मराठा सेवा संघाच्या जिल्ह्यातील कार्याला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या