प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर, ता. धाराशिव, दि. 28 जून 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य तसेच जे. ई. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी आज श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रुईभर येथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनाने महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुभाषदादा कोळगे यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जयप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री जयप्रकाश कोळगे सर, स्वामी समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. शिंदे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माने एस.आर. यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. बनसोडे डी. एस. यांनी केले.
0 टिप्पण्या