प्रतिनिधी ....मनोज जाधव
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी बच्चुभाऊ कडू यांनी गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.
या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत औसा तालुक्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी आज तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
इतकंच नव्हे तर आंदोलनकर्ते थेट तहसील कार्यालयाच्या आवारात घुसले आणि सरकारच्या विरोधात प्रखर घोषणा देत आक्रमकपणे आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनात औसा तालुक्यातील सर्व प्रहार पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने प्रहार सेवक सहभागी झाले होते.
बच्चुभाऊ कडू यांच्या मागण्यांना शासनाने तात्काळ मान्यता द्यावी, अन्यथा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
0 टिप्पण्या