प्रतिनिधी...मनोज जाधव ..
धाराशिव :-हज तीर्थयात्रेस अर्थात उलेमाला निघालेले आरोग्यमित्र शेख रौफ ब्रदर यांचा मतदार जनजागरण समितीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.शेख रौफ ब्रदर हे सेवानिवृत्त आहेत ते सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असून मतदार जनजागृतीचे ते कोषाध्यक्ष व मार्गदर्शक आहेत या तीर्थयात्रेस ते सहकुटुंब जात आहेत समितीच्या वतीने त्यांना टोपी,शाल,भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छोटेसे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या यावेळी मतदार जनजागरण समितीचे एम डी देशमुख,अब्दुल लतीफ,गणेश वाघमारे,संजय गजधने,सचिन चौधरी,प्रदीप पांढरे,श्रीकांत गायकवाड सह इतर उपस्थित होते.तीर्थ यात्रेस जाण्यापुर्वी समितीच्या वतीने सत्कार व शुभेच्छा दिल्याबद्दल शेख रौफ यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या