प्रतिनिधी....मनोज जाधव
आज दिनांक ५ जुलै २०२५ रोजी धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या नूतन कार्यकारिणीचा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी ॲडव्होकेट अमोल वरुडकर,
उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रमोद वाकुरे,सचिवपदी ॲडव्होकेट अनिकेत देशमुख,
यांनी पदभार स्वीकारला. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रहार दिव्यांग संघटनेतील दिव्यांग व्यक्तींनी सन्मानपूर्वक सत्कार केला.
कार्यक्रमादरम्यान दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या, दिव्यांग कायदा, ॲट्रॉसिटी कायदा, तसेच शासकीय नोकरीतील आरक्षण यावर सखोल व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करताना त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी न्यायसंवेदनशील दृष्टिकोनातून कार्य करण्याची ग्वाही दिली.
सदर कार्यक्रम प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली,जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शहराध्यक्ष जमीर शेख,संजय नाईकवाडी,दिनेश पोद्दार,इंद्रजीत मिसाळ,नवनाथ कचार,धनंजय खांडेकर,शिवकुमार माने,प्रकाश खडके, चांगदेव चौधरी
यांच्या मेहनतीने व सहभागाने यशस्वीरीत्या संपन्न झाला.
0 टिप्पण्या