Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

वाहतूक पोलीसांना रस्त्यावर खासगी मोबाईल फोन वापरण्यास बंदी – परिवहन विभागाचे आदेश


 

वाहतूक पोलीसांना रस्त्यावर खासगी मोबाईल फोन वापरण्यास बंदी – परिवहन विभागाचे आदेश


    प्रतिनिधी...मनोज जाधव 

मुंबई (दि. 3 जुलै 2024) – महाराष्ट्र राज्यातील वाहतूक पोलिसांनी ड्युटीवर असताना खासगी मोबाईल फोनचा वापर, फोटो काढणे, तसेच सोशल मीडियावर त्यांचे प्रसारण करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील महत्वाचे आदेश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी दिले आहेत.

दि. 2 जुलै 2024 रोजी परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या वाहतूक संधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत वाहनचालकांच्या तक्रारी, वाहतूक नियंत्रण, तसेच शिस्तबद्ध कामकाजावर भर देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलेला आहे.

वाहतूक पोलिसांनी आपल्या ड्युटी दरम्यान वाहन चालकांना थांबवून फोटो काढणे, मोबाईलवर त्याचे रेकॉर्डिंग करणे व सोशल मीडियावर पोस्ट करणे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. यावरून सरकारने गंभीर दखल घेतली असून अशा कृतीस प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्त व जिल्हा पोलीस प्रमुखांनी याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी व संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांनी या निर्देशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर योग्य ती शिस्तभंग कारवाई करण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

— सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज, धाराशिव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या