🟠 धाराशिव जिल्ह्यातील राजकीय तापमान वाढले!
शिवसेनेतील बडा नेता भाजपच्या संपर्कात — उमेदवारीची केली मागणी, प्रवेशावर जिल्ह्यात चर्चेला ऊत!
धाराशिव : प्रतिनिधी ...मनोज जाधव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच धाराशिव जिल्ह्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. सांजा जिल्हा परिषद गटातील चिखली पंचायत समिती गणातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे.
पक्षातील अंतर्गत गटबाजी, कुरघोडी आणि सततच्या उपेक्षेला कंटाळून संबंधित नेत्याने अलीकडेच भाजपच्या एका दिग्गज नेत्याची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत त्याने चिखली पंचायत समिती गणातून उमेदवारीची मागणी केली असून, “उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अधिकृतरित्या भाजप प्रवेश करेन,” असेही त्याने स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
यावरून राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चांना उधाण आले असून, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का ठरेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
आता सर्वांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे —
तो बडा नेता खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करतो का?
भाजप त्याला पक्षप्रवेश देतो का आणि तिकीट बहाल करतो का?
हे येणारा काळच ठरवेल.
👉 सांजा परिसरातील राजकारण आता अधिक रंगणार यात शंका नाही!


0 टिप्पण्या