Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

 
        

                 प्रतिनिधी....मनोज जाधव 


📰 शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र


धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज एक निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने बच्चू कडू,महादेव जानकर तसेच शेतकरी नेते राजू शेट्टी व अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे.


निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये —


संपूर्ण कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी,


सोयाबीनला योग्य हमीभाव,


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत,

या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.




शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे की, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारभावातील घसरणीमुळे शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कोलमडला असून सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा.


निवेदन देताना विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, “राज्य सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी देखील व्यापक आंदोलन छेडतील असा इशारा दिला आहे...

     निवेदनावर अक्षय नायकवडी,घनश्याम रितापुरे,बलराज रणदिवे,उमेश मगर, मयूर काकडे,निखिल गंभीरे,राजकन्या जावळे,बालाजी घुले,अशोक गाढवे,सागर घाडगे आधी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत



---



---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या