*पत्रकार सोमनाथ खंडागळे यांना छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.*
माढा येथे दि.२१ डिसेंबरला पुरस्काराचे वितरण होणार आहे.
अकलूज दि१६ (प्रतिनिधी)
माळशिरस तालुक्यात पत्रकारिता बरोबर विविध सामाज उपयोगी उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य करणारे सोमनाथ खंडागळे यांच्या कार्याची दखल घेऊन माढा येथील शंभू सेना यांच्या वतीने राज्यस्तरीय छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे.
लहानपणापासून समाज सेवा करण्याची आवड आहे तसेच प्रतिकूल परिस्थितीशी सामाना करत गेली अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध मराठी शाळेतील मुलाना २६ जानेवारी व १५ ऑगस्ट तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लहान मुलाना खाऊ वाटप व शालेय सहित्य वाटप करणे कोरोनाच्या काळात वृध्दआश्रमात व बाल आश्रमात गोरगरीबाना धान्य वाटप केले.शिक्षक,वकील,डॉक्टर, पत्रकार,कला,क्रीडा तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करणे व तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफ़त वाचनालय स्वखर्चातून चालवणे इत्यादी सामाजिक कार्य केले असून अजून ही समाज कार्य चालूच आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन माढा येथील शंभू सेनाचे संस्थापक अध्यक्ष अतुल नाना पाटील यांनी पत्रकार सोमनाथ खंडागळे यांची छत्रपती संभाजी राजे पुरस्कार २०२५ चा सामाजिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.पत्रकार सोमनाथ खंडागळे यांच्या या पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल माळशिरस तालुक्यातील पत्रकारांमधून अभिनंदनाचा वर्षाव व आनंदाचे वातावरण पसरले आहे.



0 टिप्पण्या