Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ईटकुर गटात ‘अनंत’ वादळ! शिवसेनेकडून उमेदवारीसाठी अनंत लंगडे यांचा जोरदार दावा.. सरपंच ते मार्केट कमिटी संचालक असा प्रदीर्घ प्रवास; जिल्हा परिषदेत ‘मिनी मंत्रालय’ गाठण्याची तयारी..

 

ईटकुर गटात ‘अनंत’ वादळ! शिवसेनेकडून उमेदवारीसाठी अनंत लंगडे यांचा जोरदार दावा..


सरपंच ते मार्केट कमिटी संचालक असा प्रदीर्घ प्रवास; जिल्हा परिषदेत ‘मिनी मंत्रालय’ गाठण्याची तयारी..



धाराशिव प्रतिनिधी | मनोज जाधव...


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच धाराशिव जिल्ह्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातील ईटकुर जिल्हा परिषद गटातून कोठाळवाडी गावचे विद्यमान उपसरपंच अनंत नानासाहेब लंगडे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.


अनंत लंगडे यांनी यापूर्वी कोठाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद यशस्वीपणे भूषवले असून कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक आहेत. या सर्व पदांच्या माध्यमातून त्यांनी मिळवलेला प्रशासकीय अनुभव व मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क प्रशासनावर मजबूत पकड हीच त्यांची प्रमुख ताकद मानली जात आहे.


जिल्हा परिषद निवडणूक लढवून ‘मिनी मंत्रालयात’ जाण्याच्या तयारीत असलेल्या अनंत लंगडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “पक्षाने संधी दिल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांचे मजबुतीकरण, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे आणि आरोग्य केंद्रांद्वारे सेवा थेट गावात उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने काम करणार आहे.


आजवर केलेली सर्वसामान्यांची सेवा, प्रशासकीय अनुभव आणि मजबूत जनसंपर्क यामुळे अनंत लंगडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची चर्चा मतदारसंघात जोर धरू लागली आहे. “उमेदवारी मिळाल्यास ते विजयश्री खेचून आणतील,” असा ठाम विश्वास अनेक मतदार व्यक्त करताना दिसत आहेत.


सध्या तरी ईटकुर जिल्हा परिषद गटात अनंत लंगडे यांच्या नावाचे राजकीय वादळ घोंगावत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. आता शिवसेनेकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अंतिम निर्णय येणारा काळच ठरवणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या