महिला रुग्णालयाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचा सत्कार..
धाराशिव :- नगरपरिषदेच्या शहर उपजीविका आराखडा कृती समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा शासकीय महिला रुग्णालयाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला व रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ यांचाही सत्कार करण्यात आला.गणेश वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना संधी मिळाली आहे.राष्ट्रिय नदी जोड प्रकल्पाबाबत त्यांचा राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा असुन इतर अनेक बाबतीत त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन अब्दुल लतिफ यांनी केले,तर बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री भ्रूणहत्या रोखुया स्त्री जन्माचे स्वागत करुया या सदराखाली त्यांची मुलगी अनोखी परी हिचा वाढदिवस दरवर्षी शासकीय महिला रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत करुन साजरा केला जातो.याचीही आठवण त्यांनी करून दिली.डाॅ.स्मिताताई गवळी यांनी म्हण्टले की, गणेश वाघमारे यांचे कार्य गरजवंताला हितकारक आहे,डॉ.राहुल वाघमारे यांनी ही मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.तर शेख रौफ यांनी शायरीतुन म्हण्टले की,फुलो मे फुल हो आप गुलाब हो,सितारो मे सितारे हो आप चमकता हुआ चांद हो,गणेश सर आपकी क्या तारिफ करे,आप हर मजलुम और गरीब की दिल की धडकन हो..अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या.
सत्कार केल्या बद्दल गणेश वाघमारे यांनी आभार व्यक्त केले.यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ साहेब,आरोग्य मित्र शेख रौफ ब्रदर,पत्रकार श्रीकांत मटकीवाले तसेच महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ स्मिताताई गवळी,डॉ.टिके मॅडम,डॉ.आसेफा,डॉ.राहुल वाघमारे,डॉ.एम सुर्यवंशी, डॉ.रामढवे,डॉ.प्रतिमा, इन्चार्ज अभिजीत झाडे,परिचारिका रिबेका भंडारी,माधुरी जाधव,मनिषा साळुंके,परसे, सोमासे,तांबोळी,पठाण तांबे,भोयल जावेद,मुंढे व इतर उपस्थित होते.सुत्रसंचलन डॉ.रामढवे यांनी केले तर आभार रिबेका भंडारी यांनी मानले.
0 टिप्पण्या