Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

संविधान ग्रुप बरमगाव बू च्या वतीने भीम जयंती उत्साहात साजरी

संविधान ग्रुप बरमगाव बू च्या वतीने भीम जयंती उत्साहात साजरी...

प्रतिनिधी...अमर आगळे...

बरमगाव : तालुक्यातील बरमगाव बुद्रुक येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी केली.
सर्वप्रथम जि. प. प्रा. शाळा येथे प्रतिमा पूजन करून विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तन्वी पूजा अमर आगळे यांनी अंगणवाडीयेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट म्हणून दिल्या व विध्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.
त्या नंतर ग्रामपंचायत बरमगाव बू येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेतला. त्या नंतर संविधान चौक येथे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बेंबळी पोलीस स्टेशनं चे ApI गणेश पाटील साहेब व PSI  पांडुरंग माने यांच्या हस्ते झाले. शाळेतील  विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार व्यक्त केले.
अमरदीप नामदेव शिंदे यांनी जयंती नाचून साजरी नं करता वाचून साजरी करावी या उद्देशाने गावातील गुणवंत विध्यार्थी व स्पर्धा  परीक्षा देत असलेल्या मुलांना त्यांच्या उपयोगी येत असलेले पुस्तके वाटप केली.
शाहीर प्रभाकर आगळे यांनी बाबासाहेबांवरील गाणी व आणा भाऊ साठे यांची प्रसिद्ध छक्कड "माझी मैना गावाकडे राहिली " ही साजरी केली व उपस्थित्यांची माने जिकली.
संविधान ग्रुप च्या सर्व सदस्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला.
शांतिसागर तरुण मंडळ रुईभर येथील मुलांनी भीम गीता वरील लेझीम कला साजरी केली व कार्यक्रमांची शोभा वाढवली.
उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांची नावे खालील प्रमाणे API गणेश पाटील साहेब, PSI पांडुरंग माने, पोलीस आमलदार सचिन कोळी साहेब, श्रीकृष्ण बोदर, संजय गावडे साहेब 
गावचे सरपंच बाळकृष्ण गोरे, ग्रा. सदस्य दत्तात्रय कांबळे, धनंजय कांबळे संविधान ग्रुप चे अध्यक्ष बळीराम सिरसाठे, राजकुमार सिरसाठे, जय लहुजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमर आगळे, उपाध्यक्ष शाम रसाळ, सदस्य विशाल कसबे, अभिषेक कांबळे, बंटी आप्पा कांबळे, संजय कांबळे, विशाल कांबळे, दिनेश रसाळ, नितीन कांबळे, परमेश्वर कांबळे, बालाजी कांबळे, अशोक दणाने, अनिकेत कसबे, कालिदास कसबे, गोविंद कांबळे, कालिदास कांबळे, अमन कांबळे, विशाल सिरसाठे, नानासाहेब सिरसाठे, संतोष दणाने,तसेच गावातील सर्व नागरिक व शाळेतील विध्यार्थी याची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या