Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सवाचा मंगल सोहळा ✨ श्री दत्त मंदिर संस्थान, रुईभर (ता. व जि. धाराशिव) येथे अध्यात्माची पर्वणी ✨


   
          रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सवाचा मंगल सोहळा 

✨ श्री दत्त मंदिर संस्थान, रुईभर (ता. व जि. धाराशिव) येथे अध्यात्माची पर्वणी ✨


      प्रतिनिधी....मनोज जाधव 


धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथील श्री दत्त मंदिर संस्थान येथे येत्या 20 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता अत्यंत भक्तीभावाने व वैदिक मंत्रोच्चारात भव्य कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. या पावन सोहळ्यास प.प. जगद्गुरु श्री शंकराचार्य श्री विद्या नरसिंह भारती स्वामीजी महाराज (करवीर पीठ) यांच्या शुभ करकमलांचा आशीर्वाद लाभणार असून, प.पू. श्री दत्त महाराज रुईकर आप्पा बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होत आहे.

या कलशारोहणाच्या अनुषंगाने दिनांक 13 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान विविध याग-यज्ञ व धार्मिक विधींचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तसेच दररोज दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्रीमद्भागवत सप्ताह भक्तांसाठी खुले राहणार आहे.

📿 कार्यक्रमांचा भक्तिमय क्रम पुढीलप्रमाणे :

🔸 गुरुवार, 12 फेब्रुवारी – अग्निस्थापना, श्री गणेश याग

🔸 शुक्रवार, 13 फेब्रुवारी – श्री दत्त याग, भागवत सप्ताह प्रारंभ, नारायणी याग, सुदर्शन याग, धन्वंतरी याग

🔸 शनिवार, 14 फेब्रुवारी – मृत्युंजय याग, श्री दत्त याग, कमलपुष्प अर्चना, महाआरती

🔸 रविवार, 15 फेब्रुवारी – शिवरात्री निमित्त विशेष पूजन व नियमित धार्मिक कार्यक्रम

🔸 सोमवार, 16 फेब्रुवारी – रुद्र याग, श्री दत्त याग, महाआरती व महाप्रदक्षिणा

🔸 17 व 18 फेब्रुवारी – विविध श्री दत्त याग व साधना

🔸 गुरुवार, 19 फेब्रुवारी – भागवत सप्ताह समाप्ती, ग्रंथदिंडी मिरवणूक, सकाळी 9 वाजता हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, तसेच श्री दत्त दरबार संगीत सेवा

🔸 शुक्रवार, 20 फेब्रुवारी – कलशारोहण महोत्सव, संतांचे आशीर्वाद, महाप्रसाद; हत्तीवरून साखर वाटपाने कार्यक्रमाची सांगता

या संपूर्ण सप्ताहात रुई व परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री दत्तगुरूंच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या