Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

काटगाव ZP गटातून नागनाथ मसुते निवडणूक रणांगणात ?


 



               प्रतिनिधी.....मनोज जाधव 9823751412

🗳️ काटगाव ZP गटातून नागनाथ मसुते निवडणूक रणांगणात ?

ओबीसी पुरुष प्रवर्ग सुटताच महाविकास आघाडीसमोर उमेदवारीची मागणी; तुळजापूर तालुक्यात राजकीय समीकरणे ढवळणार!

धाराशिव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आरक्षणाची सोडत जाहीर होताच राजकीय तापमान चढू लागले आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटगाव जिल्हा परिषद गट हा ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित ठरल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.



याच मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने तामलवाडी येथील नागनाथ मसुते यांनी उमेदवारीची जोरदार मागणी केली आहे.
मसुते हे सध्या तुळजापूर आगारात वाहक पदावर कार्यरत असून त्यांनी आपल्या कार्यकाळात संपूर्ण तालुक्यात एसटी महामंडळाच्या माध्यमातून जनतेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत.

लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांशी त्यांनी आत्मीयतेचे नाते जोडले आहे.
त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे आणि जमिनीवरील जनसंपर्कामुळे ते तालुक्यात लोकप्रिय झाले आहेत.
शेतकरी वर्गाशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्या समस्यांबाबत ते नेहमीच पुढाकार घेतात.

नागनाथ मसुते यांना जर महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केली,
तर तुळजापूर आगारातील सर्वच चालक व वाहक त्यांच्या पाठिशी उभे राहतील,

आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवतील, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

या उमेदवारीच्या मागणीमुळे तुळजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता महाविकास आघाडी त्यांना रिंगणात उतरवते का, हे पाहणे सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या