Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ऐन दिवाळीत घुटे कुटुंबावर संकटाचा डोंगर...! पण ‘पप्पू शिंदे’ ठरले देवदूत!


 प्रतिनिधी....मनोज जाधव 


    ऐन दिवाळीत घुटे कुटुंबावर संकटाचा डोंगर...! पण ‘पप्पू शिंदे’ ठरले देवदूत! 


दारफळ गावातील आग ग्रस्त कुटुंबाला दिला मायेचा हात — रोख मदत व किराणा देऊन साजरी केली ‘माणुसकीची दिवाळी’


धाराशिव तालुक्यातील दारफळ या गावातील लक्ष्मण किसन घुटे यांच्या घरात ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना घडली.

गॅस सिलेंडर लिकेजमुळे अचानक सिलेंडरने पेट घेतला आणि क्षणातच घराला भीषण आग लागली.

या आगीत घरातील संसारोपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. आधीच आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या या कुटुंबावर काळजाचा डोंगर कोसळला.

दीपावलीचा सण तोंडावर असताना संपूर्ण कुटुंब हताश झाले, मदतीसाठी सर्वांकडे याचना केली, पण कोणीही पुढे आले नाही.



अशा वेळी वाघोली येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप उर्फ पप्पू शिंदे यांना ही घटना समजताच त्यांच्यातील माणुसकी जागी झाली.

ते तात्काळ दारफळ येथे पोहोचले, घुटे कुटुंबाची भेट घेतली, सांत्वन केले आणि फक्त शब्दांनी नव्हे तर कृतीतून माणुसकी दाखवत रोख ₹10,000 मदत त्यांच्या घरी जाऊन दिली


या कार्यामुळे त्या कुटुंबाला आधार मिळालाच, पण गावकऱ्यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आले.

“अशा देवदूतासारख्या माणसांमुळेच अजूनही समाजात माणुसकी जिवंत आहे,” असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.


प्रदीप (पप्पू) शिंदे यांच्या या माणुसकीच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे,

आणि दारफळ गावात यंदाची “माणुसकीची दिवाळी” म्हणून ही घटना स्मरणात राहणार आहे. 



     

      यावेळी त्यांच्या समवेत सचिन जाधव पाटील, प्रमोद मोहनराव पाटील,सरपंच रवींद्र ऋषिकेश जाधव, गटप्रमुख उद्धव बाबा पाटील, सुरज प्रभाकर टिळक, उपसरपंच अनिल जाधव, बाळासाहेब केशव घुटे, किशोर शामराव घुटे ल, चिंटू पाटील व ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह गावातील युवक व ग्रामस्थ हजर होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या