जयप्रकाश विद्यालयाचा विज्ञान प्रदर्शनात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक
प्रतिनिधी....मनोज जाधव
रुईभर, दि. ९ डिसेंबर :
जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन करत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक आणि माध्यमिक गटात तृतीय क्रमांक पटकावला. दोन्ही गटांची जिल्हा पातळीवरील निवड झाल्याने विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दि. ८ डिसेंबर रोजी धाराशिव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय येथे झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकूण १२३ प्रयोग सादर करण्यात आले. त्यामध्ये जयप्रकाश विद्यालयाचा प्राथमिक गट प्रथम क्रमांक पटकावला आहे . हा प्रयोग कुमारी श्रावणी बाबासाहेब ढोले व तनुजा उमाकांत नलावडे यांनी शाश्वत शेती या विषयांतर्गत “सेंद्रिय शेतीतील अमृत-वर्मी-वॉश” हा प्रयोग सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.
त्यांना नेताजी धुमाळ, अभिजीत घोळवे आणि अभिनंदन आखाडे यांनी मार्गदर्शन केले.
माध्यमिक गट कुमारी वैष्णवी गजेंद्र एकंडे आणि सुमती दशरथ कस्पटे यांनी जल व्यवस्थापन व संवर्धन या विषयावर प्रयोग सादर करत माध्यमिक गटात तृतीय क्रमांक मिळविला.
त्यांना रामराजे लावंड, प्रसन्न धर्माधिकारी, सौ. मयुरी वडाळ मॅडम आणि अरुण गुंड यांचे मार्गदर्शन लाभले.दोन्ही गटातील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या यशाबद्दल प्राचार्य जयप्रकाश कोळगे मार्गदर्शन करताना म्हणाले,
“ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी प्रयोग घेऊन सहभागी झाले होते. आमच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने परिश्रम केल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. अशा स्पर्धा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतात. संयम, नम्रता आणि प्रयोगशील वृत्ती या गुणांच्या साहाय्यानेच सातत्याने प्रगती साधता येते.”
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास डॉ. आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री. सुभाषदादा कोळगे,
माजी जि.प. सदस्य रामदास कोळगे,
माजी ग्रा.प. सदस्य राजनारायण कोळगे,
प्राचार्य जयप्रकाश कोळगे,
प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके,
श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे,
इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार,
पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे,
शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन कांबळे यांनी तर आभार प्राध्यापक गणेश शेटे यांनी मानले.


0 टिप्पण्या