देश सेवा करणाऱ्या पोलिस दलातील अधिकाऱ्यानं घडवले माणुसकीचे दर्शन....
धाराशिव तहसील कार्यालयाने माणुसकी जपत अवघ्या पाच मिनिटात रुग्णासाठी रेशन कार्ड उपलब्ध करून दिले...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर काम करण्यासाठी आयुष्य समर्पित...
धाराशिव मधील पोलिस दलात काम करणारे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारे श्री हनुमंत काकडे साहेब यांच्या संबंधित व ओळखीचे असलेल्या जोशी परिवारातील एका व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याने सोलापूर मधील अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते तेथे डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले आणि यासाठी लागणारा खर्च हा लाखो रुपये येऊ शकतो असे सांगण्यात आले त्यावेळी काकडे साहेब यांनी त्या पेशंटचे ऑपरेशन योजनेतून करण्यासाठी आवश्यक असणारे रेशन कार्ड साठी रुग्णसेवक मनोज जाधव यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णसेवक मनोज जाधव यांनी तहसील कार्यालयात जाऊन अवघ्या पाच मिनिटात रेशन कार्ड उपलब्ध करून दिले....
माणुसकी जपणारी तहसील कार्यालयातील सर्व टीम
धाराशिव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्री अमोल बाहेकर साहेब, बालाजी ढवण साहेब, अमित बंडगर साहेब, अक्रम मणेर साहेब, ओमकार पवार साहेब, लोंढे साहेब,पिसे साहेब,काकडे साहेब या सर्वांचे त्यांना सहकार्य लाभले असे रुग्णसेवक मनोज जाधव यांनी सांगितले व आज पर्यंत हजारो रुग्णांना आपल्या हातातील काम सोडून तहसील कार्यालयात तत्काळ कागदपत्र उपलब्ध करून दिली जातात असेही त्यांनी यावेळी सांगितले...
आपले जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे पोलीस अधिकारी श्री हनुमंत काकडे साहेब यांच्या सतर्कतेमुळे त्या जोशी परिवाराचे लाखो रुपये वाचले त्या वेळी जोशी परिवारातील व्यक्तीच्या डोळ्यातील भाव व अश्रू यांनी काकडे साहेब यांचे आभार व्यक्त करण्यासाठी वाट मोकळी करून दिली....
0 टिप्पण्या