Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

दसूर (ता. माळशिरस) येथे यल्लमादेवी यात्रा महोत्सव २०२५., यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले भव्य कार्यक्रमाचे आयोजन नियोजन





            दसूर (ता. माळशिरस) येथे यल्लमादेवी यात्रा महोत्सव २०२५.


        प्रतिनिधी...मनोज जाधव 

दसूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील ग्रामदैवत यल्लमादेवी यात्रा महोत्सव २०२५ सोमवार, १ डिसेंबरपासून बुधवार, ३ डिसेंबरपर्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व पुजारी मंडळाने केले आहे.

कार्यक्रमांचे वेळापत्रक

सोमवार – १ डिसेंबर २०२५

सायंकाळी ५.०० वा. गावातून पालखीचे मंदिराकडे प्रस्थान व ओटी वाहिनी पूजन.

मंगळवार – २ डिसेंबर २०२५

सकाळी ९.०० वा. महापूजा व नैवेद्य.

सायंकाळी ६.०० वा. पालखीबरोबर कोल्हापूर ऑर्केस्ट्राचे सादरीकरण.

मुख्य दिवस – बुधवार – ३ डिसेंबर २०२५

पालखी मिरवणूक, माहेरघर घेणे व दुपारी ४.०० वा. अभिषेक.

 यात्रेचे सर्व आयोजन संपूर्ण ग्रामस्थ, दसूर व पुजारी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या