प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा गावातील शेतकरी दत्ता रणदिवे यांनी बैलपोळा सण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करत शासनाचे लक्ष वेधून घेतले.
आज बैलपोळा सणानिमित्त रणदिवे यांनी आपल्या बैलांच्या पाठीवर “चलो मुंबई”, “एक मराठा सहा कोटी मराठा” तसेच “२९ ऑगस्ट चलो मुंबई” असे नारे लिहून गावात मिरवणूक काढली. पारंपरिक उत्साहात साजरा होणाऱ्या या सणाद्वारे त्यांनी शासनाला इशारा देत संदेश दिला की, गरज भासल्यास आम्ही बैलांसह मुंबई गाठू...
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष सुरू असताना बैलपोळ्यासारख्या सांस्कृतिक सणातून रणदिवे यांनी समाजातील भावना व्यक्त केल्या. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करून त्यांच्याबरोबर नारे दिले.
👉 या अनोख्या पद्धतीने साजऱ्या झालेल्या बैलपोळ्यामुळे मेडसिंगा गावात विशेष चर्चेला ऊत आला असून, आगामी २९ ऑगस्ट “चलो मुंबई” आंदोलनाला ग्रामीण भागातूनही मोठा पाठिंबा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
0 टिप्पण्या