Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तामलवाडीच्या भूमिपुत्राचा थेट मुख्यमंत्र्यांना ई-मेल तसेच धाराशिव चे खासदार व तुळजापूरचे आमदार यांनी पण याकडे लक्ष घालण्याची शेतकऱ्याची मागणी

 

तामलवाडी महाराष्ट्र बँकेकडुन पिक कर्जाची सक्तीची वसुली 

 सर्जेराव गायकवाड यांचा मुख्यमंत्री यांना ई मेल 


तामलवाडी (प्रतिनिधी) सचिन शिंदे 

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तामलवाडी शाखेच्या वतीने पिक कर्ज भरण्यासाठी शेतकर्यांकडे तगादा लावला असुन वकीला मार्फत नोटीस, लोक अदालत मध्ये हजर रहाण्याच्या नोटीस देऊन पिक कर्जाची सक्तीची वसुली केली जात असल्याने सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांनी नोटीससह मुख्यमंत्री साहेबांना ई मेल करुन सक्तीची पिक कर्जाची सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी केली आहे.

       सध्या राज्यांमध्ये शेतकरी राजाची परीस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. निसर्गाच्या भरवशावर उसणवारी करुन, खाजगी सावकाराकडून कर्ज काढून तसेच बँकाकडुन पिक कर्ज घेऊन शेतकरी शेतामध्ये लाखो रुपये घालुन पेरणी करतो परंतु कधी वेळेवर पाऊस पडत नाही, कधी अतिवृष्टी होते तर सतत पाऊस पडत असल्याने व थोडेफार पिक आले तर त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्यांचे अतोनाच नुकसान होते व शेतकर्यांनी उसणवारी , सावकारी कर्ज व बँकेकडून घेतलेल्या पैशाची परतफेड करणे मुश्किल होते. त्यातच संसाराचा गाडा हाकत असताना मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दवाखाना खर्च याने शेतकरी खचला जाऊन शेतकरी राजावर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशातच बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने तामलवाडी ता तुळजापूर यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन पिक कर्जाची वसुली होत आहे तसेच वकीला मार्फत नोटीस काढून पिक कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. आता तर लोक अदालतीमध्ये हजर राहण्याच्या नोटीस दिल्या असल्याने शेतकरी भयभीत झाला असुन वेगवेगळ्या पध्दती वापरुन पिक कर्जाची सक्तीची वसुली केली जात आहे.

     तामलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांनी त्यांना मिळालेली नोटीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, व मा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे ई मेलच्या माध्यमातून पाठवुन सध्या अतिवृष्टी व सतत पाऊस पडत असल्याने शेतकर्यांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे सांगून शेतकर्यांची पिक कर्जाची सक्तीची वसुली केली जात आहे ती सक्तीची वसुली थांबवुन शेतकर्यांना दिलास द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.


याकडे आमदार साहेब, खासदार साहेब यांनी लक्ष देण्याची गरज

---------------------------------------------

तामलवाडी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिक कर्जाची घरोघरी जाऊन, वकीला मार्फत नोटीस काढून, लोक अदालतीमध्ये हजर राहण्याच्या नोटीस काढून जी पिक कर्जाची सक्तीची वसुली केली जात आहे व त्यामुळे शेतकर्यांना मानसीक त्रास सहन करावा लागत आहे याकडे शेतकर्यांचे कैवारी म्हणवणारे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब व जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांनी लक्ष देऊन शेतकर्यांची पिक कर्जाची होणारी वसुली थांबवावी अशी मागणी होत आहे.


आठवडा आठवडा बँक व्यवस्थापक गायब, नागरीकांची तारांबळ 

---------------------------------------------

पिक कर्जाच्या सक्तीच्या वसुलीच्या नावाखाली बँक व्यवस्थापक व इतर कर्मचारी आठवडा आठवडा बँकेतुन गायब असतात सकाळी बँक उघडल्यांनंतर जे बाहेर पडतात ते रात्री सहा वाजताच बँकेकडे परत येतात त्यामुळे दिवसभर बँकेच्या कामासाठी आलेल्या नागरीकांना ताटकळत बसुन न काम होताच रिकाम्या हाताने परतावे लागते व इतर कामं धंदा सोडून दररोज बँकेत हेलपाटे घालावे लागतात. पिक कर्जाच्या सक्तीच्या वसुलीच्या नावाखाली आठवडा आठवडा बँक व्यवस्थापक गायब होत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन याकडे वरीष्ठ संबंधित अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी नागरीकांमधुन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या